Ad will apear here
Next
‘अशोक’चा निकाल १०० टक्के
पुणे : टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ संचालित अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

यावर्षी बारावीच्या परीक्षेला महाविद्यालयातून ३११ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उल्लेखनीय गुण मिळवत उत्तीर्ण झाले आहेत. ३११ पैकी १७५ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ. विकास आबनावे, चेअरमन सुमन घोलप, उपाध्यक्ष पी. डी. आबनावे, प्रसाद आबनावे, प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रमुख रेखा दराडे, वर्गशिक्षिका नीता गुमास्ते, वंदना अनारसे, मंगल क्षीरसागर, ज्योती हिरे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

‘गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने अशोक विद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करीत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवल्याचा आनंद वाटतो,’ अशी प्रतिक्रिया संस्थेचे सचिव डॉ. विकास आबनावे यांनी व्यक्त केली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZJIBO
Similar Posts
डॉ. आबनावे यांना उत्कृष्ट वक्ता पुरस्कार पुणे : ग्लोबल अचिव्हर्स फाउंडेशन या संस्थेकडून दिला जाणारा ‘उत्कृष्ट वक्ता’ (बेस्ट इंटरनॅशनल स्पिकर अॅवॉर्ड) पुरस्कार येथील महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनाबे यांना प्रदान नुकताच करण्यात आला. ताश्कंद (उझबेकिस्थान) येथे झालेल्या सोहळ्यात ताश्कंदचे माजी गव्हर्नर अडोलोट नासिरोरा यांच्या
‘सर्वंकष लोकशाहीचा विचार होणे गरजेचे’ पुणे : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक, आर्थिक आणि समताधिष्ठित लोकशाहीची कल्पना मांडली होती; परंतु, त्यांच्या या कल्पनेला गेल्या ७० वर्षांत तडे गेले असून, केवळ राजकीय लोकशाहीचे अस्तित्त्व आज आपण पाहतो आहोत. त्यामुळे राजकीय लोकशाहीचे सर्वंकष लोकशाहीमध्ये रूपांतर होणे गरजेचे आहे,’ असे मत ज्येष्ठ संपादक अरूण खोरे यांनी व्यक्त केले
‘बाबूजींचे कार्य पुढे नेत असल्याचा अभिमान’ पुणे : ‘देशाचे माजी उप-पंतप्रधान बाबू जगजीवन राम यांनी समाजासाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. दलित, अल्पसंख्याक आणि मागासवर्गातील घटकांना ताठ मानेने जगण्याची प्रेरणा त्यांनी दिली. त्यांचे स्मरण करताना त्यांच्या कार्यातून शक्ती मिळते. बाबूजींचे हे कार्य यशस्वीपणे पुढे नेताना त्यांची मुलगी म्हणून अभिमान
‘सुख, शांती, समाधान हीच खरी संपत्ती’ पुणे : ‘माणसाकडे साधन संपत्ती किती आहे, त्यापेक्षा त्याच्याकडे सुख, समाधान आणि शांती आहे का? हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे संपत्तीच्या मोहात न पडता सुख, समाधान आणि शांती मिळवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपल्या डोळ्यांना जे दिसते ते खरे असलेच असे नाही, त्यामुळे सर्वांनी स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न केला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language